पेणदिशा ते ईचावडी
समस्त हिंन्दूवासीयांना ज्याचा सार्थ अभिमान आहे. ज्याच्या स्मरणानेच अंगात चैतन्य सळसळते. जे स्वकर्माने सांब सदाशिवाचे अवतार म्हणून गणले गेले. ते हिंदवीस्वराज्य संस्थापक युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या चरण स्पर्शाने पुनीत झालेली माती, ज्या मातीला स्वराज्याची राजधानी होण्याचा मान मिळाला. त्या रायगडच्या मातीबद्दल आम्हास नेहमीच अभिमान असतो. याच मातीने जगताला आचार्य भावे, इतिहासकार राजवाडे, गोपाळ गोडसे, सिडी देशमुख, पेशवे, डॉ. आंबेडकर, क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, हुतात्मा भाई कोतवाल, हिराजी पाटील हे आणि यासारखेच इतर साहित्य, कला, क्रिडा, राजकारण, समाजकारण, अध्यात्म इ. क्षेत्रातील दिग्गज नररत्ने दिली. जसे येथील नररत्ने तसेच येथील देखणे निसर्ग शिल्प, स्वराज्याचे शिलेदार म्हणून म्हटले जाणारे गड, किल्ले, डोंगराच्या छाती खोदून, एखाद्या नववधुच्या करकमला वरील मेंदीच्या सुंदर नक्षी प्रमाणे शोभून दिसणा-या, कोरलेल्या लेण्या, रमणीय सागरकिनारे व त्याना पहाण्यासाठी वारंवार लयबध्द नर्तन करत लाटेवर स्वार होऊन किना-यावर झेपावनारा रत्नाकर, प्रियकराच्या भेटीकरता उत्सुक झालेल्या प्रेयसी प्रमाणे स्वत:ला झोकून देत वेगाने काठावरील जीवने समृध्द करत समुद्रास मिळण्यासाठी जाणा-या नद्या, विवीध पशू, पक्ष्यांचे आश्रयस्थान असणारी वन व त्यातील समृध्द वनसंपदा परंतू आजच्या इंटरनेट युगात या सर्वांबद्दल एक पान माहिती नसावी? याबद्दल मनात एक प्रकारची सल होती आणि त्यातूनच जन्म झाला. रायगडच्या अभिमाना सन्मान करता सॅल्यूट टू रायगड (Salute to Raigad) हे बोधवाक्यच ध्येय समजून पेणदिशा.कॉम (www.pendisha.com) या मराठी संकेतस्थळाचा (www.pendisha.com) सामाजिक ऋणाच्या जाणीवेतून पेण तालूका एवढेच माहीती क्षेत्र मानून, पेण तालूक्यातील माहीती विवीध सदराद्वारे पेणदिशा.कॉम (www.pendisha.com) या संकेतस्थळामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. सदर संकेतस्थळाची निर्मीती २००१ साली दिशा कंम्प्यूवर्ल्ड या संस्थेने केली. तालूक्याचे मध्यवर्ती ठिकाणी म्हणून पेण आणि तालूक्याच्या सीमेपर्यंत त्याच्या आजूबाजूच्या दिशा म्हणून, पेण व दिशा या दोन शब्दांचा संयुक्तशब्द पेणदिशा (pendisha) हे नाव ठेवण्या मागे आहे. या संकेतस्थळावर आतापर्यंत भरपूर लोकांनी भेट दिली आहे. संकेत स्थळावरील माहीतीस इ-टिव्ही, झी-टिव्ही, एनडी टिव्ही, इंडीया टिव्ही, दुरदर्शन (डीडी न्युज ) या दुरचित्रवाहीन्यांनी मुलाखती व बातमी स्वरूपात प्रसिध्दी दिली असून वेळोवेळी सामना, लोकसत्ता, मार्मिक, रायगड समाचार, रायगड टाईम्स, पुण्यनगरी, कृषिवल, सकाळ, ईशसंदेश इ. आघाडीच्या वर्तमानपत्रात या माहीतीचे वृत्तांत प्रसिध्द झालेले आहेत.
पेणदिशाला लाभलेले प्रेम, वाचकांचे प्रतिसाद, हितचिंतकांच्या सुचना व अपेक्षांचा विचार करता पेण दिशामध्ये माहीती क्षेत्राची माहीती वाढवण्यात आली. मायमराठीवर प्रेम करणा-या तिचा अभिमान वाटणा-या आणि तीच्या प्रसारासाठी धडपडणा-या प्रत्येकाला आपली वाटावी या हेतूने नव्या स्वरूपातील पेणदिशा.कॉमचे नवे नाव इचावडी.कॉम असे करण्यात आले.
इचावडी या नावामागिल उद्देश असा की, ज्याकाळी बातम्या, माहीती किंवा विचार प्रदर्शनासाठी आजच्यासारखी प्रसार माध्यमे (रेडीओ, टीव्ही, वर्तमानपत्र, इंटरनेट इ.) नव्हती. तेव्हा माहीती मिळण्याचे एकमेव स्त्रोत म्हणजे प्रत्येक गावाची चावडी याच ठिकाणी ज्ञानोपासना, मनोरंजन, उपदेश, मार्गदर्शन, न्याय निवाडे होत असत. त्यामुळे तेव्हा चावडीला सामान्य जीवनात महत्वाचे स्थान होते. त्याच चावडीवर इंटरनेटच्या माध्यमातून सर्व विश्वाची एक आणि एकच चावडी बनवण्याच्या उद्देशानेच ईचावडी नाव देण्यात आले आहे.
